चित्तेगाव टोलनाक्याजवळ १९ गोवंशाची सुटका

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वित्तेगाव ठेलनाक्याजवळ पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर गोवंश वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडला. या कारवाईत ५ लाख ४० हजार रुपये किमतीची १९ जनावरे जप्त केली आहे. 

त्यांना पारुंडी येथील गोशाळेत सुरक्षित हलवले आहे. शनिवारी (ता. सात) रात्री ११.५० या सुमारास हॉटेल लकीसमोर पोलिसांनी सापळा रचून आयशर गाडी (क्र. एमएच २० जीसी २०९२) अडवली. तपासणीदरम्यान चालक अजय अशोक गायकवाड (वय २३, रा. पाटोदा, जि. जळगाव) याने कोणत्याही परवानगीशिवाय आणि निर्दयपणे जनावरे कोंबून नेल्याचे उघड झाले. जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ही वाहतूक कत्तलीसाठी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास पोलिस हवालदार आप्पासाहेब माळी करत आहेत. घेऊन शेख जाकीर शेख मुसा, तनवीर रौफ कुरेशी, इरफान उस्मान कुरेशी, रौफ ऊर्फ बाबा कुरेशी आणि रईस ऊर्फ बाबा कुरेशी हे पाच जण पसार झाले. घटनास्थळावरून १ लाख ६० हजार रुपये किमतीचे ८०० किलो मांस, १ लाख ५० हजार रुपयांची रिक्षा (क्र. एमएच २० ईएफ ०५४०), इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि कत्तलीसाठी वापरलेली शस्त्रे जान केली आहेत. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुधांशु बडोले यांनी मांसाची तपासणी केल्यानंतर ते गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेले मांस नगर परिषदेच्या डंपिंग ग्राउंडवर नष्ट केले आहे.